ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

मावळात राजकीय भुकंप होणार

'दे धक्का' तंत्राचा वापर होणार; आजी-माजी आमदार एकमेकांना धक्का देणार, की दोघे मिळून विरोधकांना धक्का देणार...

आजी-माजी आमदारांच्या वक्तव्याच्या कलगीतुऱ्याची रंगलीय चर्चा

वडगाव मावळ : लोकसभा निवडणूक प्रचारकाळात, मावळात झालेल्या महायुतीच्या सभांमधून आजी-माजी आमदारांनी केलेली वक्तव्ये मतदानानंतर चर्चेचा विषय ठरतो आहे. मावळात राजकीय भूकंप होणार पण नक्की कधी होणार, कुठे होणार, विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना नेमके दे धक्का तंत्र वापरणार, की दोघे आजी-माजी आमदार मिळून विरोधकांवर दे धक्का तंत्राचा वापर करणार याबाबतच्या उत्सुकतापूर्ण चर्चांना सध्या मावळ तालुक्यात उधाण आले आहे.

गतवेळी झालेल्या मावळ विधानसभा निवडणुकीत उमेदवार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत तत्कालीन राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा दारूण पराभव केला होता. तालुक्यातील सलग २५ वर्षांच्या भाजपचा प्रस्थापित सत्तास्थानाला शेळके यांच्या विजयाने सुरूंग लागला. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि आमदार शेळके यांना विधानसभेत सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसण्याची संधी मिळाली. सत्तेतील आमदार म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी विश्वासाचे संबंध अधिक बळकट करून मावळ तालुक्यासाठी भरघोस निधी आणत विकासाच्या कामातून जनमतावरील पकड अधिक घट्ट केली. राजकीय भूकंपानंतर राज्यात शिंदे – फडणवीसांचे सरकार सत्तास्थानी आले. आमदार शेळके यांना किमान वर्षभर विरोधात बसावे लागले.

याकाळात तालुका भाजप पुन्हा आक्रमक झाली. शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांनी त्यांचा गट सहभागी करून भूकंपाचा दुसरा हादरा दिला. साहजिकच आमदार शेळके पुन्हा सत्ताधाऱ्यांच्या गटात बसले. या सर्व घडामोडीत स्थानिक पातळीवरही त्याप्रमाणे बदल घडत गेला. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळायचा या एकाच हेतूने राष्ट्रवादी आणि भाजपाचे आजी- माजी आमदार युतीचा नारा देत एकत्रित आले. चार वर्षांपूर्वी एकमेकांच्या विरोधात लढलेले हे दिग्गज विरोधक लोकसभा निवडणुकीत एकत्र आल्याने मावळवासीयांनीही समाधान व्यक्त केले होते. दरम्यान, भेगडे व शेळके हे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार एकत्रित करताना दिसले; परंतु प्रचारकाळात झालेल्या एका सभेत आमदार शेळके यांनी ‘तुम्हालाही माहीत नसेल, की तुमच्या खाली मीसुध्दा सुरुंग लावून बसलोय’, असे वक्तव्य केले. तर भेगडे यांनी दुसन्या सभेत ‘सुरुंग विरोधकांना लावायचाय, महायुतीला नाही.’ असे वक्तव्य केले होते. या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांनी मात्र मावळवासियांमध्ये पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

महायुतीचा धर्म पाळायचा हा एकच शब्द मतदान होईपर्यंत ऐकायला मिळत होता. मात्र मतदान झाल्यावर आम्ही काम केले. त्यांनीच केले नाही, अशी वक्तव्ये ऐकायला मिळत आहेत. पराभव झाला तर त्याचे खापर समोरच्यावर फोडायचे असा सावध प्रयत्न यातून होत आहे. बारणे विजयी झाले तर त्याचे श्रेय लाटणयाची या दोगांची धडपड सुर असल्या डपड सुरू असल्याची चर्चा आता व्यापक होताना दिसते. त्यात खासदार बारणे यांनी राष्ट्रवादीच्या काही लोकांनी काम केले नसल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, या आरोप प्रत्यारोपांमुळे आता आजी-माजी आमदारांनी केलेल्या वक्तव्यांची आठवण मतदारांना होत आहे. दोन्ही नेत्यांनी सुरुंग लावण्याबाबत केलेली वक्तव्ये नक्की कोण कोणाला सुरूंग लावणार, की दोघे मिळून विरोधकांना सुरुंग लावणार? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button