breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मराठा आरक्षण ; सात आमदारांचे राजीनामासत्र

मुंबई – मराठा आरक्षणासाठी राज्यातील आमदारांचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत सात आमदारांनी राजीनामे दिले असून आणखी काही आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.

सकल मराठा समाजाने शांततेत आणि शिस्तीत 58 मार्चे काढल्यानंतरही मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटू न शकल्याने मराठा समाजाने क्रांती मोर्चाचे रूपांतर ठोक मोर्चात केले आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यभर आंदोलन पेटले आहे. काही ठिकाणी या मोर्चाला हिंसक वळण लागले. राज्य सरकार जर मराठा समाजाला आरक्षण देणार नसेल, तर आमदारांनी राजीनामे द्यावेत, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते.

त्याला प्रतिसाद देत कन्‍नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सर्वप्रथम आपला राजीनामा सादर केला. त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठविला. वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही आपला राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी गोदावरीत जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे हे चिकटगावकर यांच्या मतदार संघातील होते.

राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक व शासकीय नोकरीत आरक्षण मिळावे, म्हणून इंदापूरचे आ. दत्तात्रय भरणे यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठविला.  मंगळवेढ्याचे काँग्रेसचे आमदार भारत भालके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा, धनगर, मुस्लिम आणि महादेव कोळी यांच्या आरक्षणासाठी आपण राजीनामा देत असल्याचे भालके यांनी म्हटले आहे. मोहोळचे आमदार रमेश कदम हे सध्या तुरुंगात आहेत. मात्र, त्यांनी तुरुंगातूनच आपला राजीनामा दिला.

नाशिकमधील देवळा चांदवड मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर आणि नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांनीदेखील राजीनामा दिला आहे. हे दोन्ही आमदार भाजपचे आहेत. आपल्याला आमदारकीपेक्षा समाज मोठा असल्याचे सांगत दोघांनी मराठा मोर्चाच्या समन्वयकांकडे आपले राजीनामे सोपविले आहेत. पाच आमदार मराठा समाजाचे आहेत. तर दत्तात्रय भरणे हे धनगर समाजातील आहेत. रमेश कदम हे मागास प्रवर्गातील आमदार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button