breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

‘World Cup २०२३ साठी ‘या’ दोन खेळाडूंची निवड न करणं म्हणजे सर्वात मोठा झटका’; माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

World Cup २०२३ : वर्ल्ड कप २०२३ ला ५ ऑक्टोंबर पासून सुरूवात होणार आहे. वर्ल्ड कपसाठी काही दिवस बाकी असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. भारतीय संघही संघाच्या तयारीसाठी सज्ज झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी खेळाडूने दोन खेळाडींच्या निवडीबाबत मोठं विधान केलं आहे.

माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी दोन खेळाडूंची आयर्लंडविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवड न झाल्याने मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आलं आहे. पण के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोन खेळाडूंची नाव का नाहीत. राहुल आणि अय्यरच्या फिटनेसबाबत अजून काही प्रश्न आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – मोदी-पवार भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा..

जसप्रीत बुमराह २४ कॅरेट सोनं आहे मात्र अनेकवेळा त्याने कमबॅक केलं आणि परत दुखापतीमुळे बाहेर झाला. दोघांची सतत संघात नावं नाहीत म्हणजे ते आशिया कपची तयारी करू शकणार नाहीत का? जर दोघेही वर्ल्ड कप खेळू शकणार नसतील तर वर्ल्ड कपच्या पारश्वभूमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे, असं आकाश चोप्रा म्हणाले.

दरम्यान, ५ ऑक्टोंबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button