breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Maval – ऊसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

सांगवडे येथील एका शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरु आहे. आज (मंगळवारी) सकाळी नऊच्या सुमारास ऊस तोडणी कामगारांना ऊस तोडत असताना बिबट्याची दोन पिल्ले ( बछडे ) आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मावळचे परिक्षेत्र वन अधिकारी व कर्मचारी सांगवडेत दाखल झाले असून पिल्लांच्या आईची आणि त्यांची भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मंगळवारी ( दि. ३) सकाळी सांगवडे येथील शिवारात महेश लिमन यांच्या शेतात ऊस तोडणी करताना कामगारांना उसात बिबट्याची दोन पिल्ले असल्याचे आढळून आल्याने त्यांनी तातडीने लिमन यांना कळविले. लिमन यांनी मावळचे वन विभागास कळविल्यानंतर मावळचे परिक्षेत्र वन अधिकारी सोमनाथ ताकवले यांच्यासह वन विभागाचे संबंधित सर्व कर्मचारी या भागात दाखल झाले आहेत. वन विभागामार्फत आई व दोन्ही पिल्लांची भेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याचे ताकवले यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button