मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

बॉलीवूड अभिनेत्यासह झळकली मराठमोळी स्पृहा जोशी!

हिंदी कलाविश्वातील एका वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली

मुंबईः अलीकडच्या काळात बरेच मराठी कलाकार हिंदी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रिया बापट, सई ताम्हणकर, सुव्रत जोशी, महेश मांजरेकर, प्रथमेश परब या कलाकारांपाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्याबरोबर स्क्रीन शेअर केली आहे.

आपला सहज सुंदर अभिनय व कविता यांच्या जोरावर घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री स्पृहा जोशी नुकतीच हिंदी कलाविश्वातील एका वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये स्पृहाने आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आता स्पृहाने नेमक्या कोणत्या सीरिजमध्ये महत्त्वाची भूमिका साकारलीये हे जाणून घेऊयात…

स्पृहा जोशीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रणनीती’ या सीरिजमध्ये लहानशी पण लक्षवेधी भूमिका साकारली आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने स्वत: पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. अभिनेत्री लिहिते, “‘रणनीती’ सीरिजमध्ये साकारलेल्या लहानशा भूमिकेसाठी गेल्या काही दिवसांत जे काही कौतुक करण्यात आलं त्यासाठी मी सदैव ऋणी आहे. माझ्या भूमिकेवर भरभरून प्रेम केल्याबद्दल धन्यवाद! ‘रणनीती’ सीरिजमध्ये मी लहानशी भूमिका साकारली आहे. ही सीरिज तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.”

“जिमी शेरगिलसारख्या आवडत्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यावर आणि काय हवं? जिमी तुझ्याबरोबर पुन्हा एकदा काम करताना खूप मजा आली. सेटवरचा प्रत्येक क्षण काहीतरी शिकवणारा आणि वेगळा अनुभव देणारा ठरला. एवढ्या चांगल्या टीमचा मला एक भाग होता आलं यासाठी मी प्रचंड आनंदी आहे. या सीरिजचा एकही एपिसोड चुकवू नका नक्की पाहा” अशी पोस्ट शेअर करत स्पृहाने तिच्या कामाबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button