breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात सुरु झाला ‘मिट्टी सत्याग्रह’

पुणे |महाईन्यूज|

पुण्यामधील अनेक संस्थांनी एकत्र येत शुक्रवारपासून (१२ मार्च २०२१) पुणे महानगरपालिकेजवळ नदीपात्राजवळ ‘मिट्टी सत्याग्रह’ सुरु केला आहे.  दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांचे फोटो असणारे बॅनर, तिरंगा हातात पकडून घोषणाबाजी करत या ‘मिट्टी सत्याग्रहा’ला काल पुण्यात सुरुवात झाली.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांचे फोटो असणारे बॅनर, तिरंगा हातात पकडून घोषणाबाजी करत या ‘मिट्टी सत्याग्रहा’ला काल पुण्यात सुरुवात झाली. दिल्लीमध्ये मागील चार महिन्यांपासून अधिक काळापासून केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांनाविरोध करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ‘मिट्टी सत्याग्रह’ सुरु करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये मागील चार महिन्यांपासून अधिक काळापासून केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांनाविरोध करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ‘मिट्टी सत्याग्रह’ सुरु करण्यात आला आहे.

महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुरु केलेल्या असहकार चळवळीची शतकपुर्ती आणि दांडी यात्रेची सुरुवात झाली त्या दिवसाला १२ मार्च रोजी ९० वर्षे पूर्ण झाली. त्यामुळेच या दिवशी हा ‘मिट्टी सत्याग्रह’ सुरु करण्यात आला आहे.
या सत्याग्रहामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांनी छोट्या आकाराच्या माठांमध्ये बिया गोळा केल्यात. या माध्यमातून आम्ही अन्नदात्यासोबत आहोत असा संदेश देण्याचा आंदोलकांचा प्रयत्न आहे. या बिया दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत नेण्याचा या ‘मिट्टी सत्याग्रह’ करणाऱ्यांचा मानस आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button