breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० टक्क्यांची घसघशीत सूट!

माजी आमदार विलास लांडे यांचा पुढाकार; दिवाळीनिमित्त शहरवासियांसाठी खास ऑफर

पिंपरी : एलईडी टीव्ही, फ्रीज आदीसह विविध वस्तूंवर तब्बल ७० टक्के घसघशीत सूट मिळणार आहे. दिवाळीनिमित्त माजी आमदार विलास लांडे यांच्या पुढाकारातून ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान लांडेवाडी, भोसरी येथील तुळजा भवनी मंदिरासमोर याचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे. माजी नगरसेवक विक्रांत लांडे, युवा नेते विराज लांडे यांनी याचे आयोजन केले आहे.

दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा आणि चैतन्याचा आहे. दिवाळी गोड व्हावी, यासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपड्यांची दुकारे आदीसह विविध दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिक रांगा लावत आहेत. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी विविध आकर्षक योजना देखील राबविल्या जातात. मात्र अधिक खर्चिक योजना न राबविता नागरिकांना परवडेल अशा दरात वस्तू देण्याचा उपक्रम माजी आमदार विलास लांडे यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत आहे. दिवाळी निमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तूवर ७० टक्के सूट देऊन वस्तूंची विक्री करण्याचा उपक्रम लांडे यांच्या माध्यमातून होणार आहे.

हेही वाचा – Media Association of India : पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचार्‍यांसाठी ‘माई’ ठरणार आधार! 

या सर्व वस्तूंवर एक वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. वस्तू खराब झाल्यास एक वर्षांची रिप्लेसमेंटची सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. नागरिकांना १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. माजी नगरसेवक विक्रांत लांडे, युवा नेते विराज लांडे यांनी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बजाज फायन्सासची देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी ९००५३८४८४८ आणि ८९८३६३७८३९ या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

..अशी मिळणार सवलत!

५०,४० आणि ३१ इंची एलईडी टीव्ही, वॉटर कुलर, छोटा फ्रीज विक्रीसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली आहे. एक लाख सात हजाराचा ५० इंची एलईडी टीव्ही अवघ्या २८ हजार ५५५ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. ४८ हजारांचा ४० इंची एलईडी टीव्ही अवघ्या १४ हजार ५५५ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर ३४ हजारांचा ३२ इंची एलईडी टीव्ही अवघ्या ९ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. १४ हजारांचा वॉटर प्युरिफायर ४ हजार ७७७ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर छोटा फ्रीज २१ हजारांऐवजी ९ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button