ताज्या घडामोडीराष्ट्रिय

तुम्हाला इन्कम टॅक्स रिफंड मिळाला का? असे तपासा

प्राप्तिकर विभागाने 2021-22 या चालू आर्थिक वर्षात 20 मार्चपर्यंत 2.26 कोटी करदात्यांना 1.93 लाख कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा जारी केला आहे. यामध्ये 70,977 कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर परतावा आणि 1,22,744 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा समाविष्ट आहे. त्यामुळे आता तुमचा प्राप्तिकर परतावा आला की नाही असा प्रश्न तुमच्या मनात असेल. तर तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सहज तपासू शकता. त्याची प्रक्रिया तपशीलवार जाणून घेऊया.

प्राप्तिकर विभागाची वेबसाईट म्हणजे www.incometax.gov.in वर जा आणि तुमचा पॅन, वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून खात्यात लॉग इन करा.
त्यानंतर e-file या पर्यायावर क्लिक करा. ई-फाइल पर्यायाखाली प्राप्तिकर रिटर्न निवडा आणि नंतर फाइल केलेले रिटर्न पाहा या पर्यायावर क्लिक करा.
आता तुम्ही दाखल केलेला ताजा प्राप्तिकर विवरणपत्र तपासा. View Details पर्याय निवडा. एकदा निवडल्यानंतर, तुम्हाला दाखल केलेल्या प्राप्तिकर विवरणपत्राची स्थिती दिसेल. यामध्ये तुम्हाला कर परतावा जारी करण्याची तारीख, परत केलेली रक्कम आणि या वर्षातील कोणत्याही रिफंडच्या मंजुरीची तारीखदेखील दिसेल.
तसेच प्राप्तिकर परतावा तपासण्याचा दुसरा मार्ग म्हणजे एनएसडीएल वेबसाईटवर त्याची स्थिती तपासणे. हे लक्षात घ्यावे की वेबसाईटवर, करदात्याला रिफंडचे स्टेटस मूल्यांकन अधिकाऱ्याने रिफंड बँकेकडे पाठवल्यानंतर 10 दिवसांनंतरच तपासता येईल.

सर्वप्रथम https://tin.tin.nsdl.com/oltas/refundstatuslogin.html वर जा.
त्यानंतर तुमचा पॅन तपशील भरा.
त्यानंतर, ज्या मूल्यांकन वर्षासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स रिफंडचे स्टेटस तपासायचे आहे ते निवडा. 2020-21 या आर्थिक वर्षाचे मूल्यांकन वर्ष 2021-22 हे असेल.
शेवटी, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा. तुमच्या इन्कम टॅक्स रिफंडच्या स्टेटसवर आधारित, तुमच्या स्क्रीनवर एक संदेश दिसेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button