breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘NDA सरकार कधीही कोसळू शकतं’; काँग्रेस नेत्याचं सूचक विधान

नवी दिल्ली | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने २४० जागांवर विजय मिळविला. बहुमताचा २७२ हा आकडा त्यांना गाठता आला नाही. यासाठी त्यांना एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. यावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तसेच एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं, असं ते म्हणाले.

मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, एनडीए सरकार चुकून स्थापन झाले आहे. मोदींकडे बहुमत नाही. त्यांचे सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते. आम्हाला तर वाटते सरकार पाच वर्ष चालावे, देश चांगल्या पद्धतीने चालला पाहीजे. देश बळकट करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन काम करू. पण आमच्या पंतप्रधानांची सवय आहे की, जी गोष्ट व्यवस्थित सुरू आहे, ती त्यांच्या पचनी पडत नाही. आमच्या बाजूने आम्ही देशासाठी काम करत राहू.

हेही वाचा     –      काँग्रेसची विधानसभेच्या २८८ जागा लढण्याची तयारी सुरु; नाना पटोलेंचं मोठं विधान 

दरम्यान, बिहारचे माजी मंत्री आणि विद्यमान विधानपरिषदेचे आमदार नीरज कुमार यांनी खरगेंच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरगे यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील कामगिरीकडे आधी पाहावे, असा पलटवार नीरज कुमार यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button