breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘इंडिया’कडून अरविंद केजरीवाल पंतप्रधान पदाचे उमेदवार? आपच्या नेत्याचं सूचक विधान

नवी दिल्ली : भाजपच्या विरोधात तयार झालेल्या इंडिया आघाडीची बैठक उद्या मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीला विरोधी पक्षातील सर्वच नेते मुंबईत दाखल झाले आहेत. या बैठकीत अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात असं बोललं जात आहे. या बैठकीत पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे ठरलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाने अरविंद केजरीवाल यांचे नाव पंतप्रधान पदासाठी सुचवले आहे.

आपच्या मुख्य प्रवक्त्या प्रियंका कक्कर यांना इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीचा चेहरा कोण असावा असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या की, केजरीवाल यांनी नेहमीच फायदेशीर आणि लोकहितार्थी असा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंतप्रधान पदाच्या उमेदवारासाठी एक प्रवक्ता म्हणून मी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा प्रस्ताव देईन.

हेही वाचा – गोविंदांसाठी मोठी बातमी! राज्य सरकार ७५ हजार गोविंदांना विमा कवच देणार

अरविंद केजरीवाल यांनी लोकांच्या फायद्याचे मॉडेल सादर केले आहे. त्यामुळे ते पंतप्रधान व्हावे अशी माझी इच्छा आहे, परंतु निर्णय माझ्या हातात नाही, असं प्रियंका कक्कर म्हणाल्या.

प्रत्येक पक्षाला त्यांच्या नेत्याने पंतप्रधान व्हावे असे वाटते. आप सदस्यांनाही त्यांचा अरविंद केजरीवाल पंतप्रधान व्हावे असे वाटते, असं आपचे दिल्लीचे संयोजक गोपाल राय म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button