राज्यात थंडीचा कडाका वाढणार! जाणून घ्या हवामान अंदाज
पुणे : देशामध्ये अनेक ठिकाणी थंडीचा कडाका वाढत चालला आहे. तर, दुसरीकडे राज्यातही थंडीचा कहर चांगलाच वाढला आहे. आठवड्याच्या शेवट आणि नव्या आठवड्याची सुरूवात कडाक्याच्या थंडीने होणार आहे.
हवामाना विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, नंदुरबार, जळगांव, अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात किमान तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – लोकसभेच्या ९ जागांसाठी अजित पवार गट आग्रही; संभाव्य उमेदवारांची यादी समोर?
पुढील २४ तासांमध्ये बांगलादेशच्या दक्षिण किनाऱ्यापासून दक्षिण पूर्व बंगालपर्यंत बहुतांश भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर, तिथं तामिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टी भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागांमध्येही पावसाच्या तुरळक सरींची शक्यता असून, देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्येही पावसाचा शिडकावा होऊ शकतो.