breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांबाबत मोठा निर्णय; वाचा सविस्तर..

SSC and HSC Exam : राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण भरण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय लगेचच लागू करण्यात आला आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील ‘प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड’ या दुव्याद्वारे लॉग इनचा वापर करून शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ऑनलाइन पद्धतीने मंडळाकडे जमा करावे लागणार आहेत.

राज्य मंडळाच्या www.mahahssboard.in या संकेतस्थळावरील ‘प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड’ या लिंक मधून प्रचलित लॉगिन आयडी व पासवर्डचा वापर करून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल ,तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे गुण मंडळाकडे जमा करावे लागणार आहेत.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर याबाबतचे सविस्तर परिपत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे फेब्रुवारी मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठीचे गुण शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांना व प्राचार्यांना ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहेत.

हेही वाचा –एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी’; संजय राऊतांची खोचक टीका

प्रात्यक्षिक तोंडी श्रेणी अंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देऊन शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा आऊट ऑफ  टर्न  लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळांनी कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येणार आहे नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिले आहेत, अशाच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक आऊट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालयांना व शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या विद्यार्थ्यांचे गुण सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच नोंदवावे लागणार आहेत. राज्य मंडळांनी ऑनलाईन गुण कसे भरावेत या संदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button