breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

धक्कादायक! मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या जेवणात सापडला मेलेला उंदीर

मुंबई | मुंबईतील एक प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका ग्राहकाने हॉटेलमधून ऑर्डर केलेल्या जेवणात चक्क मेलेला उंदीर सापडल्याची बाब उघडकीस आली आहे. मुंबईतील बार्बेक्यू नेशन रेस्टॉरंटमध्ये हा जीवघेणा प्रकार घडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल ७५ तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं.

प्रयागराजहून मुंबईत आलेले वकील राजीव शुक्ला हे रिपन पॅलेस नावाच्या हॉटेलमध्ये थांबले होते. ८ जानेवारीच्या रात्री ते पार्सल घेण्यासाठी वरळीतील बार्बेक्यू नेशन या आलिशान रेस्टॉरंटच्या आऊटलेटवर पोहोचले. तेथे त्यांनी जेवणाची ऑर्डर पार्सल घेतली. यावेळी ऑर्डर केली गेलेली दाल मखनी थोडी खाल्ल्यानंतर पार्सलच्या डब्यात त्यांना मेलेला उंदीर दिसला. त्याचा त्यांनी फोटो काढून सोशल मीडियावरही पोस्ट केलाय. या दाल मखनीमुळे शुक्ला यांची तब्येत इतकी खालावली की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

हेही वाचा    –    ‘एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी’; संजय राऊतांची खोचक टीका 

तीन दिवस ते रुग्णालयाच्या खाटेवर पडून होते. सर्वांत निराशाजनक बाब म्हणजे त्या व्यक्तीची तक्रार तर घेतली गेली नाहीच; परंतु या गंभीर प्रकारासंदर्भात असूनही एफआयआर दाखल करून घेतलेला नाही.दरम्यान तक्रारदार राजीव शुक्ला यांनी याप्रकरणी एक्सवर एक पोस्ट केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button