breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

सुवर्णनगरीला संघर्षांचा फटका; जळगावमध्ये दरांत चढ-उतार

मुंबई |

आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध घडामोडींसह रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा परिणाम होऊन सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवडय़ात सोन्याचे दर वधारले होते. आता आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. सुवर्णनगरीत सोमवारी सकाळी प्रतितोळा एक हजार ३५० रुपयांनी, तर चांदी प्रतिकिलो दोन हजार ६० रुपयांनी स्वस्त झाली. रशिया-युक्रेन यांच्यातील युध्द अधिक दिवस सुरू राहिल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल.

सोन्याचे दर प्रतितोळा ६० हजारांची पातळी गाठू शकतात, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. गेल्या आठवडय़ात रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे सोन्याचे दर वाढले. रशिया-युक्रेन संघर्षांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या खरेदी-विक्रीवर दिसून आला. गेले काही दिवस सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने उसळी दिसून आली. सुवर्णनगरीत सोमवारी २४ कॅरेट सोने प्रतितोळा ५१ हजार ४०० रुपये तर चांदी प्रतिकिलो ६५ हजार ५२० रुपये असे दर होते.

रशिया-युक्रेनच्या युद्धाचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे शहरातील सराफ व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. सुवर्ण नगरीत चार दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ५३ हजार ५०० रुपये या विक्रमी पातळीवर होते. युद्धजन्य स्थितीत जगभरात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ झाल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. गुरुवारी सोन्याच्या दरात ११९० रुपयांनी वाढ झाली, तर चांदीच्या दरात १४८० रुपयांची वाढ झाली होती. २४ कॅरेट प्रतितोळा सोन्याचा दर ५२ हजार ७५० रुपये, तर चांदी प्रतिकिलो ६७ हजार ५८० रुपये आहे. सराफ व्यावसायिकांकडून सोन्यावर जीएसटीसह आयात आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. प्रत्यक्ष युध्दाला तोंड फुटल्यानंतर त्याचा थेट परिणाम सोन्याच्या बाजारपेठेवर झाला आहे.

स्थानिक सराफ बाजारात सलग तीन दिवस सोने महागले. या काळात सोने दीड हजार तर, चांदी अडीच हजारांनी महागली. गेल्या आठवडय़ात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ झाली. त्यामुळे सोने दराने ५२ हजारांचा टप्पा पार केला होता. आता आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी दरात घसरण झाली आहे.

  • सोने म्हणजे सुरक्षित गुंतवणूक

रशिया आणि युक्रेनमधील संकटाचा थेट परिणाम सोन्याच्या खरेदी-विक्रीवर दिसून येत आहे. युद्धजन्य स्थितीत गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा सुरक्षित मार्ग म्हणून सोन्याला पसंती दिली जाते. त्यामुळे सोन्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली. दराने ५२ हजारांचा टप्पा पार केला. २४ कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर ५२ हजार ७५० रुपये, तर चांदीचा प्रतिकिलो दर ६७ हजार ५८० रुपयापर्यंत गेला. सोमवारी ते काहीसे कमी झाले.

गेल्या आठवडय़ापासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार सुरू राहिले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे दरात वाढ झाली आहे. गुरुवारी रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. हा तणाव वाढल्यास आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल. – मनोहर पाटील (व्यवस्थापक, आर. सी. बाफना ज्वेलर्स, जळगाव)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button