Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, सुशोभीकरण; शिवेंद्रसिंहराजेंकडून ५० कोटींचा निधी

सातारा : सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा आणि सुशोभीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. शहरातील पोवई नाका ते विसावा नाका (बॉम्बे रेस्टॉरंट) या रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून सीआरएफमधून ५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच हा रस्ता उच्च दर्जाचा होणार आहे, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धिपत्रकाव्दारे देण्यात आली आहे.

सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण, सुधारणा आणि सुशोभीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. यातील प्रमुख मार्ग पोवई नाका ते विसावा नाका (बॉम्बे रेस्टॉरंट) या रस्त्याची सुधारणा व सुशोभीकरण करण्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, राहुल अहिरे, प्रशांत खैरमोडे, आर्किटेक्ट प्रसन्न देसाई आदी उपस्थित होते.

या रस्त्याचे सुशोभीकरण करताना कोणकोणती कामे, सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत याबद्दलच्या आराखड्याची चित्रफितीद्वारे बैठकीत माहिती देण्यात आली. पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट या रस्त्याचे काँक्रीटीकरण, डिव्हायडर, फुटपाथ, सायकल ट्रॅक, रस्त्याच्या बाजूने बागबगीचे, बंदिस्त गटर यासह पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा –  ‘पुरवणी बजेटमध्ये सगळं भरून काढू’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा शहर एक ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे रस्त्यांची सुधारणा करताना पर्यटन वाढीचा दृष्टिकोन ठेवून काम करा. रस्त्याचे काम करताना प्रत्येक काम दर्जेदार करण्याची सूचना शिवेंद्रसिंहराजेंनी केली. तसेच हा रस्ता शहरातील सुंदर आणि आकर्षक रस्ता करण्याचा प्रयत्न करा, असेही ते म्हणाले.

दरम्यान, पोवई नाका ते वाढे फाटा या रस्त्यावरील कूपर कॉलनी येथील नागरिकांची आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी रस्त्याच्या रुंदीकरणाचा उपयोग करून याठिकाणी दुतर्फा वाहतूक करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली अशी माहिती या कार्यालयाने दिली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button