Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळशेज घाटातील पर्यटन होणार आणखी आकर्षक, स्कायवॉक उभारण्याची अजित पवार यांची घोषणा

Malshej Ghat : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारचा पहिला आणि आगामी वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अजित पवार यांनी विविध घोषणा केल्या आहेत. यामध्ये राज्यातील पर्यटन क्षेत्रासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे.

अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना, पाटण तालुक्यातील कोयनानगर आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेले प्रसिद्ध पर्यटनस्थळ माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या या घोषणेमुळे माळशेज घाटात स्कायवॉक उभारल्यानंतर पर्यटनाचा आणखी वेगळा अनुभव घेता येणार आहे.

ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या वेशीवर असेलल्या माळशेज घाट हा पर्यटकांना कायमच खुणावतो. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी येथे पर्यटकांची झुंबड उडते. मुरबाड मतदारसंघाच्या वेशीवर असलेल्या माळशेज येथील घाटाचे रूप बदलून येथील पर्यटकांना वेगळ्या प्रकारे निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी या पुलाचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘हे तर चॅम्पियन बजेट’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

दरम्यान यापूर्वी २०२३ मध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोनावळ्यातही स्कायवॉक उभारण्यास मंजुरी दिली होती. लोणावळा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) लायन्स पॉइंट आणि टायगर पॉइंट या लोकप्रिय पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी १२५ मीटर लांबीचा काचेचा स्कायवॉक बांधण्यासाठी ३३३.५६ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पात सहा मीटर रुंदीचा आणि ९० मीटर लांबीचा पूल बांधण्याचा समावेश आहे, परंतु मुख्य आकर्षण १२५ मीटर लांब आणि सहा मीटर रुंदीचा स्कायवॉक असेल.

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सादर केलेल्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पात संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त मुंबईत त्यांचेही स्मारक बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासह पुढील दहा वर्षांत पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button