Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘त्या’ लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं; आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, ही एक राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. मात्र ही योजाना सुरू करतानाच या संदर्भात सरकारनं काही अटी घातलेल्या होत्या, या अटीमध्ये न बसणाऱ्या महिला देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना दिसून येत आहेत, या संदर्भात आता शासनानं मोठा निर्णय घेतला आहे.

लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे, ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत त्यांचा अर्ज बाद ठरवला जात आहे, त्यांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. अनेक महिलांचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त असताना तसेच नावावर घर आणि चारचाकी वाहन असताना देखील काही महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं दिसून आलं आहे, या महिलांची नावं या योजेनेतून वगळण्यात येत आहेत. धक्कादायक म्हणजे चक्क सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

हेही वाचा – गोकुळच्या अध्यक्षपदी नविद मुश्रीफ

“लाभार्थ्यांची पडताळणी” ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. या प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास २ लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे २२८९ सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे’. असा ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button