Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एप्रिल ते जून या महिन्यात उष्णतेची लाट येणार

या राज्यात येणार उष्णतेची लाट

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. अजुनही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशातच हवामान विभागाने एप्रिल ते जून दरम्यान राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

फेब्रुवारीत राज्यातील पारा ४० अंशावर गेला होता. आता एप्रिल ते जून दरम्यान तापमान किती वाढणार याची चिंता सर्वांना सतावत आहे. वातावरणातील बदलाने पिकांना मोठ्या फटका बसण्याची देखील शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्याचा उष्णतेचा पारा अधिक राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या उष्णतेचा सामना करताना काळजी घेण्याची गरज आहे. एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे पाऊस देखील चिंता वाढवू शकतो.

या राज्यात येणार उष्णतेची लाट

बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि हरियाणातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतातील काही भाग सोडला तर सर्वच ठिकाणी भीषण गर्मीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button