तळवडे एमआयडीसीसह देहूगाव अंधारात!
४५०० हजार उद्योग ठप्प; नागरिकांचे भर उन्हाळ्यात वीज पुरवठ्याअभावी हाल

गवताच्या आगीत ७ वीजवाहिन्या जळाल्या;
तळवडे, देहूगाव परिसरात वीजपुरवठा विस्कळीत
पिंपरी चिंचवड : तळवडे येथे गवताच्या आगीत महावितरणच्या २२ केव्ही व ३३ केव्ही क्षमतेच्या तब्बल ७ वीजवाहिन्या जळाल्या. परिणामी तळवडे पाणीपुरवठा योजनेसह तळवडे एमआयडीसी व इंडस्ट्रीयल परिसरातील सुमारे ४५०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवारी (दि. २९) दुपारी पावणे चारच्या सुमारास खंडित झाला. यातील सुमारे १८०० उद्योगांना पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर उर्वरित २७०० उद्योगांसह पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा रात्री १० वाजेपर्यंत पूर्ववत करण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणकडून दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरु आहे.
दरम्यान, या आगीमुळे देहूगाव, चिंचोली गावातील २५०० घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. मात्र पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळी ६ वाजेपर्यंत या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. आगीमुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा गेल्या २ महिन्यांतील हा नववा प्रकार आहे.
हेही वाचा : “पीसीएमसी @५०” उपक्रमांतर्गत 20 हजार नागरिकांचे सर्वेक्षण
महावितरण ने दिलेल्या माहितीनुसार तळवडे येथील डोंगरावरील वाळलेल्या गवताला मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली. ही आग सर्वत्र पसरत गेली. डोंगराशेजारी असलेल्या एका ओढ्याच्या कडेपर्यंत ही आग आली. त्याच ठिकाणी असलेल्या महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या ४ आणि ३३ केव्ही क्षमतेच्या ३ वीजवाहिन्या या आगीत जळाल्या. त्यामुळे तळवडे एमआयडीसी, इंडस्ट्रीयल परिसर तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तळवडे पाणीपुरवठा योजनेसह सुमारे ४५०० लघु व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. या सर्व परिसराला नियमित वीजपुरवठा करणाऱ्या ४ आणि पर्यायी वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त असलेल्या ३ वीजवाहिन्या जळाल्या. त्यामुळे वीजपुरवठ्याची पर्यायी सोय उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र इतर पर्यायी व्यवस्थेतून सुमारे १८०० औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तासांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
तीन कंत्राटदार व सहा जॉईंटर यांना पाचारण करून एकाचवेळी सर्व वीजवाहिन्यांचे दुरुस्ती काम सुरु केले आहे.अतिरिक्त कार्यकारी अभियंता किरण सरोदे, सहायक अभियंता ऋषिकेश बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन या कामाला वेग दिला आहे. टप्प्याटप्प्याने औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येणार आहे.
-अतुल देवकर, कार्यकारी अभियंता भोसरी विभाग