दिल्ली येथील प्रजासत्ताक परेडमध्ये राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थी सहभागी

पुणे : भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्म यांच्या उपस्थितीत ७४ वा प्रजासत्ताक दिन राजपत दिल्ली येथे संपन्न झाला. २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथील प्रजासत्ताक परेड मध्ये राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या राष्ट्रीय कॅडेट कॉप्स (NCC) मधील विद्यार्थ्यी सहभागी होवून चमक दाखवली.
राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॅडेट वॉरंट ऑफिसर (CWO) प्रथमेश गाढवे, योगिता लामा या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. दरवर्षी, नवी दिल्लीतील कर्तव्य पथ (पूर्वीचा राज पथ) वर प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये NCC कॅडेट्सचा मोर्चा असतो. या परेडसाठी देशभरातील सर्वोत्कृष्ट NCC कॅडेट्सची निवड करण्यात केली जाते. JSPM च्या RSCOE मधील दोन विद्यार्थ्यांनी ही प्रतिष्ठित निवड प्रक्रिया पूर्ण केली आहे. 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ते कार्तव्य मार्गावर कूच केले .
कॅडेट वॉरंट ऑफिसर (CWO) प्रथमेश गाढवे हा मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याला प्रजासत्ताक दिन परेड कार्तव्य पथ मार्च पास्ट, नवी दिल्ली यासाठी निवडले होते. तर कॅडेट वॉरंट ऑफिसर (CWO) योगिता लामा हि तृतीय वर्ष ई आणि टीसी अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. प्रजासत्ताक दिन महाराष्ट्र संचालनालय यासाठी निवडले होते.







