‘मुळ पवार विरूद्ध बाहेरचे पवार’; अखेर शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले..
![Sharad Pawar said that I had not spoken like that](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Sharad-Pawar-Supriya-Sule-and-Sunetra-Pawar-780x470.jpg)
पुणे | ‘मुळ पवार विरूद्ध बाहेरचे पवार’ असे वक्तव्य केल्यानंतर शरद पवार वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अजित पवार गटासह महायुतीच्या नेत्यांनी शरद पवारांवर यावरून जोरदार टिका केली होती. तर विरोधकांकडूनही त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवार केंद्र स्थानी आले होते. यावर आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिले आहे.
अजित पवारांनी केलेल्या विधानानंतर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र पवारांनी दोन्ही पवारांमध्ये फरक दाखवल्याने ते टिकेचे धनी झालेत. यावर आज साताऱ्यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यावर शरद पवार म्हणाले की, मी तसं बोललेलो नव्हतो. मी जे बोललो होतो. ते पत्रकाराने विचारलं, अजित पवार यांनी काही भाषण केलं होतं. त्यांच्या भाषणात सांगितलं की जनतेनं मला निवडून दिलं. त्यांना स्वत: निवडून दिलं. ताईला निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या. त्यापुढए त्यांनी आणखी काही वाक्य वापरलं होतं.त्याच्या संबंधित मी फक्त स्पष्टीकरण केलं. यापेक्षा वेगळा काही अर्थ काढण्याची गरज नाही. असे शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा – लहुजी शक्ति सेनेचा भाजपा-महायुतीला बिनशर्त पाठिंबा
दरम्यान, देशातील महिला आरक्षणाचा निर्णय घेणारा राज्यातला पहिला मुख्यमंत्री होतो. शासकीय सेवेत आरक्षणाचा निर्णय माझा होता. केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्री असताना लष्करात मुलींना समाविष्ट करून घेण्याचा निर्णय हा माझा होता. असे अनेक विषय आहेत. ज्या निर्णयांमध्ये महिलांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल याची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्याला सार्थ करण्यासाठी त्याचा पाठपुरावा केला असेही शरद पवारांनी म्हटलंय.