TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

एकनाथ शिंदेंकडून बंडखोर आमदारांना ताकद; बालाजी कल्याणकरांच्या मतदारसंघात कोट्यवधींचा निधी

नांदेड : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आणि इतर १० अपक्ष आमदारांसह बंड केलं आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा सत्तापालट घडवून आणण्यासाठी ज्या आमदारांनी मदत केली त्यांना ताकद देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून आता जोरदार प्रयत्न सुरू असून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांतील कामासाठी मोठ्या प्रमाणात निधीची घोषणा करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नांदेड उत्तर वळण रस्त्यासाठी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. तसंच शहरातील रस्ते विकासासाठी ५२ कोटी रुपयांच्या निधीलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. या भागातील रस्ते विकासासाठी तब्बल ७८० कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार कल्याणकर यांनी केली होती.

रस्त्यांसाठी निधी आणत असताना बालाजी कल्याणकर यांनी हिंगोलीकडे वर्ग करण्यात आलेली दोन अत्यंत महत्त्वाची कामे सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडकडे पुन्हा खेचून आणण्यासाठी यश मिळवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बजावून सांगत आमदार बालाजी कल्याणकर यांची कामे प्राधान्य करा, असे निर्देश दिल्याची माहिती आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button