पुन्हा तुरुंगात टाकण्याच्या धमकीला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले, खून करा नाहीतर तुरुंगात टाका

आमच्या पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आम्ही तरुंगात जाऊ
मुंबई : खासदार संजय राऊत यांनी पुन्हा तुरुंगात जायची तयारी करावी, अस वक्तव्य शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांनी केलं आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी तुम्ही म्हणजे न्यायालय किंवा कायदा नाही. असं असेल तर दीपक केसरकर यांनीही २०२४ साली तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असा इशारा दिला आहे.
संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात टाकण्याची धमकी शिंदे गटाचे मंत्री केसरकर यांनी दिली. याचा अर्थ काय? न्याय व कायदा तुमच्या कोठीवर नाचत आहे? खोके देऊन त्यांना गुलाम केलें आहे? हुकूशाहीचा अंत होईल. तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही. खून करा नाहीतर तुरुंगात टाका, असं ट्विट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
मी महाराष्ट्र आणि माझ्या पक्षासाठी पुन्हा तुरुंगात जायलाही तयार आहे. मी दीपक केसरकर यांच्यासारखा पळपुटा आणि लफंगा नाही. तुम्ही म्हणजे न्यायालय किंवा कायदा नाही. असं असेल तर दीपक केसरकर यांनीही २०२४ साली तुरुंगात जायची तयारी ठेवावी, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला. मी आता तुरुंगात जायला तयार आहे, पण मग केसरकरांनीही २०२४ मध्ये तुरुंगात जाण्यास तयार राहावे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.




