दहावी-बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारित वेळापत्रक जाहीर
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल-मे महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,04,327 वर
दहावी-बारावीचे सुधारित वेळापत्रक
दहावीची लेखी परीक्षा – 29 एप्रिल ते 20 मे
दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा – 21 मे ते 10 जून
बारावीची परीक्षा – 23 एप्रिल ते 21 मे
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा – 22 मे ते 10 जून
महत्त्वाचे म्हणजे 40 ते 100 गुणांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटांची वेळ वाढविण्यात येणार आहे. तर 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटांची वेळ वाढविण्यात येणार आहे. दरम्यान, सुधारित वेळापत्रक www.mahasscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना
परीक्षेच्या एक ते दीड तास आधी केंद्रावर हजर राहावे.
विद्यार्थ्यांसह पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांचे थर्मल स्क्रीनिंग होणार आहे.
तापमान तपासल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याआधी किमान 30 मिनिटे आधी बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी उपस्थित असावे.
मास्क, पाण्याची बाटली, स्वत:चे लेखन साहित्य वापरणे बंधनकारक असणार आहे.





