Breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सचिन तेंडुलकर झाला ‘या’ चिमुकल्याचा चाहता

नवी दिल्ली : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे जगात कोट्यवधी चाहते असतील पण सचिन नुकताच एका चिमुकल्याचा चाहता झाला असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मोहसिन या व्यक्तीने आपल्या भाच्याचा क्रिकेट खेळतानाचा व्हीडीओ ट्विटरवर पोस्ट कोला आहे. या व्हीडीओमध्ये हा चिमुकला प्लॅस्टीकच्या बॅटने मोठे फटके लगावत असल्याचे दिसत आहे. मोहसिन यांनी हा व्हीडीओ सचिनसह भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना टॅग केला आहे.

मोहसिनचा हा व्हीडीओ सचिनने पाहिला आणि त्याला या चिमुकल्याची फलंदाजी आवडली. … अन् हा क्रिकेटचा देव चक्क त्याचा चाहता झाला.  या व्हीडीओतील चिमुकल्याची फलंदाजी पाहून सचिन म्हणाला की, ” स्ट्रेट ड्राइव्ह, उंचपुरे फटके, फ्लिक्स… ग्रेट. हा नव्या युगाचा खेळाडू आहे. तू चांगली फलंदाजी करत आहेस. असंच चांगलं खेळत राहा आणि खेळाचा आनंद लुटत राहा. ”

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button