रावेत पोलीस स्टेशनचा १ तास श्रमदान उपक्रमात सहभाग
पिंपरीः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मन की बातच्या माध्यमातून १ ऑक्टोबर रोजी स्वच्छतेसाठी १ तास श्रमदान करण्याचे आवाहन केले. त्यानुसार स्वच्छता हीच सेवा या उपक्रमाअंतर्गत रावेत पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व कर्मचारी, अधिकाऱ्यांनी या 1 तास श्रमदान उपक्रमामध्ये उत्साहाने सहभाग नोंदविला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोलीस सहाय्यक निरीक्षक परवेज शिकलगर, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, पोलिस उपनिरीक्षक अनिल टर्फे, इतर पोलीस अधिकारी, डॉ.कुदळे ओजोस हाॅस्पिटल व रावेत पोलीस मित्र गणेश सोनटक्के (पोलीस सारथी सामाजिक संस्था युवा-अध्यक्ष रावेत) श्री सुरज सुदाम पांढरे (पोलीस सारथी सामाजिक संस्था युवा-अध्यक्ष पिंपरी-चिंचवड शहर) व पोलीस सारथी संस्था, रावेत पोलीस मित्र, शांतता कमिटी (रावेत पोलीस स्टेशन) आदींनी मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभाग नोंदवला.





