Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘राजारामबापू’ ने फोडली ऊस दराची कोंडी! पहिला हप्ता ३२०० रुपये!

अध्यक्ष प्रतिकदादा पाटील : ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाईल!

इस्लामपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव- सुरुल व कारंदवाडी युनिटकडील सन २०२४-२५ हंगामातील ऊसास पहिला हप्ता ३२०० रुपये प्रतिटन देणार आहे. सन २०२४- २५ मधील अंतिम दर अंदाजे ३२७५ रुपये अपेक्षित असून उर्वरित रक्कम दिपावलीच्या सणास देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी दिली. तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडील ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाईल असे ही त्यांनी सांगितले.

अध्यक्ष प्रतिकदादा पाटील म्हणाले की राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकासाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ठिंबक सिंचन योजना, सच्छिंद्र पाईप योजना, विविध खते, जैविक खते कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरविली जात आहे. कारखाना कार्यक्षेत्रात सहकारी पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून शेतीस पाणी पुरवठा केला जात आहे. तसेच शेती उपयोगी वस्तू कमी दरात शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत. आ. जयंतराव पाटील जलसंपदा मंत्री असताना दुष्काळी भागास पाणी पुरवठा करणाऱ्या योजनाना गती दिल्याने दुष्काळी भागात पाणी उपलब्ध झाल्याने ऊसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

हेही वाचा –  ‘सर्व शेतमालाची खरेदी हमीभावाने’; केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

प्रतिकदादा पाटील म्हणाले की कारखाना व्यवस्थापनाने सन २०२४-२५ हंगामात साखराळे युनिटकडे ९ लाख ५० हजार मे. टन, वाटेगाव- सुरुल युनिटकडे ५ लाख मेटन, कारंदवाडी युनिटकडे ४ लाख ५० हजार मेटन तसेच जत-तिप्पेहळ्ळी युनिटकडे ३ लाख असे एकूण २२ लाख मेटन ऊसा गाळपाचे उदिष्ट ठेवले आहे. तरी सर्व ऊस उत्पादक व सभासद यांनी पिकविलेला सर्व ऊस गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक देवराज पाटील, प्रदिपकुमार पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहूली, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील, चिफ अकौंटंट संतोष खटावकर उपस्थित होते.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button