Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मोठी बातमी! लोणावळ्यात पावसाचा इशारा; 20 व 21 ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर

शहरासह घाटमाथ्यावर सतत पावसामुळे अनेक रस्ते जलमय

पुणे | लोणावळा शहर व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने 20 व 21 ऑगस्ट 2025 रोजी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरासह घाटमाथ्यावर सतत पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत. हवामान विभागाने पुढील तीन दिवस ‘रेड अलर्ट’ जाहीर केला असून अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता तातडीने सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा       :        मुसळधार पावसाचा तडाखा: पवना-मुळशी धरणं भरले; वाकड, सांगवी परिसराला पूराचा धोका 

शाळा व्यवस्थापन, शिक्षक व कर्मचाऱ्यांना सुट्टीदरम्यान शाळांतील महत्वाचे दस्तऐवज व अभिलेख सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, अभ्यासक्रमातील नुकसान भरून काढण्यासाठी उर्वरित दिवसांत अध्यापन कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचे निर्देशही दिले आहेत.

हाईलाईट्स :

1. 20 व 21 ऑगस्ट रोजी लोणावळ्यातील सर्व शाळांना सुट्टी
2. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय, रेड अलर्ट जारी
3. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा निर्णय
4. शाळांना अभिलेख सुरक्षित ठेवण्याच्या सूचना
5. लोणावळा शहरातील पालक व विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button