Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मोठी बातमी! कुख्यात दहशतवादी साकिब नाचनचा तिहार जेलमध्ये मृत्यू

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचनचा तिहार जेलमध्ये ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

मुंबई | कुख्यात ISIS दहशतवादी साकिब नाचनचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. साकिब तिहार जेलमध्ये होता, अचानक बेशुद्ध पडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ब्रेन हॅमरेजमुळे त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याच दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. साकिब ISIS मॉड्यूलमधील महत्त्वाचा आरोपी होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखलआहेत. नाचन तिहार तुरुंगातील क्रमांक 1 मध्ये बेशुद्ध अवस्थेत असल्याचं आढळल्यानंतर त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

2002 आणि 2003 मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड इथे झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी साकिब नाचनला दोषी ठरवण्यात आलं होतं. दहशतवाद प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (POTA) शस्त्रास्त्रे बाळगल्याबद्दल नाचनला दोषी ठरवण्यात आलं होतं आणि त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. भिवंडी आणि बोरिवलीमध्ये त्याच्या घरावर ATS ने काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती.

हेही वाचा     :      एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजची ‘‘इंडिया टुडे रँकिंग 2025’’ मध्ये राष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी! 

1997 मध्ये भारतात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची जबाबदारी साकिबवर देण्यात आली होती. मुंबईत दोन बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याने त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. त्याची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर 2017 मध्ये त्याची सुटका झाली. त्यानंतर तो 2017 मध्ये सुटका झाल्यानंतर तो आयसिसमध्ये सामील झाला. माहितीनुसार, तो महाराष्ट्र आयसिस मॉड्यूलचा प्रमुख होता. त्याने भिवंडीजवळील पडघ्याला स्वतंत्र क्षेत्र म्हणून घोषित केलं होतं, असा संशय पोलिसांना आहे. साकीबला अल-शाम म्हणजेच एक प्रकारचा इस्लामिक सिरिया पडघ्यात तयार करायचा होता. त्याने पडघा गावाला अल-शाम असं नाव देखील दिलं होतं.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button