एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजची ‘‘इंडिया टुडे रँकिंग 2025’’ मध्ये राष्ट्रीय स्तरावर यशस्वी कामगिरी!
शिक्षण विश्व : महाविद्यालयाच्या व्यवस्थापन, समर्पित प्राध्यापकवर्ग, गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे यश

पुणे | एमएईईआरच्या एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (MITACSC), आळंदी (D), पुणे या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली उल्लेखनीय ओळख निर्माण केली आहे. इंडिया टुडे बेस्ट कॉलेज रँकिंग 2025 मध्ये महाविद्यालयाने विविध पदवी अभ्यासक्रमांमध्ये भरीव यश मिळवले असून, ही कामगिरी शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवणारी ठरली आहे.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापन, समर्पित प्राध्यापकवर्ग, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे ही उल्लेखनीय रँकिंग मिळवता आली आहे. व्यवस्थापन (BBA), संगणकशास्त्र (BCA, B.Sc. CS), वाणिज्य (B.Com) या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयाने राष्ट्रीय, राज्य आणि विभागीय स्तरावर मान्यताप्राप्त यश संपादन केले आहे.
इंडिया टुडे 2025 रँकिंगमधील MITACSC ची ठळक कामगिरी
सामान्य रँकिंग (India Today Overall College Rankings)
BBA (Bachelor of Business Administration)
▪ 83वा क्रमांक – अखिल भारतीय स्तरावर
▪ 8वा क्रमांक – महाराष्ट्रात
▪ 4था क्रमांक – पुण्यात
BCA (Bachelor of Computer Applications)
▪ 21वा क्रमांक – अखिल भारतीय स्तरावर
▪ 2रा क्रमांक – महाराष्ट्रात
▪ 2रा क्रमांक – पुण्यात
B.Com (Bachelor of Commerce)
▪ 142वा क्रमांक – अखिल भारतीय स्तरावर
▪ 12वा क्रमांक – महाराष्ट्रात
▪ 4था क्रमांक – पुण्यात
B.Sc. (Computer Science)
▪ 152वा क्रमांक – अखिल भारतीय स्तरावर
▪ 13वा क्रमांक – महाराष्ट्रात
▪ 3रा क्रमांक – पुण्यात
हेही वाचा : लेखकच आपल्या देशाचे कल्याण करतील; शिक्षण तज्ज्ञ डॉ. न. म. जोशी
श्रेष्ठ उदयोन्मुख महाविद्यालये (Best Emerging Colleges Category)
BBA:
▪ 33वा क्रमांक – अखिल भारतीय स्तरावर
▪ 4था क्रमांक – महाराष्ट्रात
▪ 1ला क्रमांक – पुण्यात
BCA:
▪ 3रा क्रमांक – अखिल भारतीय स्तरावर
▪ 1ला क्रमांक – महाराष्ट्रात
▪ 1ला क्रमांक – पुण्यात
B.Com:
▪ 35वा क्रमांक – अखिल भारतीय स्तरावर
▪ 1ला क्रमांक – महाराष्ट्रात
▪ 1ला क्रमांक – पुण्यात
B.Sc. (Computer Science):
▪ 25वा क्रमांक – अखिल भारतीय स्तरावर
▪ 2रा क्रमांक – महाराष्ट्रात
▪ 1ला क्रमांक – पुण्यात
शैक्षणिक गुणवत्ता आणि नवोन्मेषी उपक्रमांचा पुरस्कार
या रँकिंगमुळे MITACSC ची सातत्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता, आधुनिक शिक्षणपद्धती, उद्योग-समन्वयीत अभ्यासक्रम, कौशल्यविकास कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर दिलेला भर अधोरेखित होतो. जागतिक स्पर्धेसाठी सज्ज, कर्तबगार आणि मूल्याधिष्ठित नागरिक घडवणे हे महाविद्यालयाचे मुख्य ध्येय असून, त्यादृष्टीने शिक्षणाचे धोरण राबवले जात आहे. महाविद्यालयाचा हा गौरव संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरला असून, शिक्षण क्षेत्रात दर्जेदार कामगिरीसाठी MITACSC हे नाव अधिक ठामपणे अधोरेखित झाले आहे.