मान्सून सक्रिय! राज्यातील ‘या’ ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, जाणून घ्या हवामान अंदाज

Weather Update : मान्सून सक्रिय झाला असून विशेषतः दक्षिण द्वीपकल्पीय भारत, कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कोकणात पावसाचा जोर अधिक आहे. मान्सूनने संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र; गुजरातचा काही भाग, मध्य प्रदेशचा नैऋत्य भाग; विदर्भ, छत्तीसगड, ओडिशाचा काही भाग आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीमचा काही काही भाग व्यापला आहे. पुढील २४ तासांत विर्दभातील उर्वरित भागात मान्सून पोहोचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. रायगड जिल्ह्याला आज (दि.१६ जून) रेड अलर्ट दिला आहे. येथे काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. तर याच जिल्ह्यासाठी १८ ते १९ रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यालाही आजपासून पुढील ४ दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रासाठीही पुढील ३ दिवस ऑरेंज अलर्ट राहील, असे हवामान केंद्राने म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाट क्षेत्रातही आज आणि उद्या मुसधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबईला आज ऑरेंज अलर्ट दिला आहे. सातारा जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट असून पुढील ३ दिवस ऑरेंज अलर्ट राहील. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात पुढील चार दिवस हलक्या ते मध्य स्वरुपाच्या पाऊस राहील. तर विदर्भातील जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
ज्या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात येतो. या भागांत कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्तीची शक्यता असते.
हेही वाचा – लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हर फ्लो..
कुठे कुठे ऑरेंज अलर्ट?
रायगड- १८ ते २९ जून
रत्नागिरी- १६ ते १९ जून
सिंधुदर्ग- १६ ते १७ जून
पुणे जिल्हा घाट क्षेत्र- १७ ते १९ जून
कोल्हापूर घाट क्षेत्र- १६ ते १७ जून
सातारा घाट क्षेत्र- १७ ते १९ जून