Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मिशन विधानसभा निवडणूक: अजित पवारांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा जाहीर!

महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सध्या राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये सक्रिय

मुंबई  : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले, संजय सोनवणे समाजाच्या भल्यासाठी काम करत आहे मी त्यांना आश्वासन देतो की राष्ट्रवादी सर्वसमावेशक आहे, आणि मी आमच्या 10% जागा अल्पसंख्याकांना देईन. राज्याला पुढे नेण्यासाठी शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या मार्गावर काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा –  To The Point : आश्चर्य आणि असहायता…! पिंपरी-चिंचवडमधील इच्छुक शिलेदारांचे सैन्य माघारी!

आंबेडकरी विचारांचा पक्ष अशी ओळख असलेला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष सध्या राज्यातील २३ जिल्ह्यांमध्ये सक्रिय आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत संजय सोनवणे म्हणाले की, संविधान बदलले जाईल आणि आरक्षण संपुष्टात येईल, या विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आम्ही प्रत्युत्तर देऊ इच्छितो. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देणार असल्याचे पक्षाने जाहीर केले.

पक्षाच्या पाठिंब्यामुळे इंदापूरमध्ये राष्ट्रवादीची स्थिती आणखी भक्कम झाली आहे. संजय सोनवणे यांच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीला मोठ समर्थन मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button