Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘यंदा पण कोथरूडकर मला मोठ्या मताधिक्क्याने निवडून देतील’; चंद्रकांत पाटलांना विश्वास

पुणे | महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी काल कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो कोथरूडकरांनी काल पुण्याच्या रत्यावर अलोट गर्दी केली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, भाजपा नेते सी.टी.रवीजी यांंच्यासह अनेक महायुतीचे नेते उपस्थित होते. यावेळी, यंदा पण कोथरूडकर मला मोठ्या मताधिक्क्याने निवडून देतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

आमदार म्हणून मी कोथरूडकरांची पाच वर्षं सेवा करू शकलो. माझ्यावरील प्रेमाची जणू ही पावतीच होती. ही गर्दी, हे प्रेम पाहून मीसुद्धा भारावून गेलो होतो. गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतुकीची समस्याही झाली. त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त करतो. रॅलीला गर्दी करणाऱ्या माझ्या कोथरूडकरांचे मनापासून आभार मानतो. हे प्रेम असेच कायम राहील याची खात्री आहेच. ही गर्दी म्हणजे जणू महायुतीच्या कोथरूडमधील विजयाचा शंखनादच होता. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा     –      मोशीकर आमदार महेश लांडगे यांच्या एकुजटीने पाठीशी!

तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत कोथरूडकरांनी मोठ्या मताधिक्क्याने मला निवडून दिले होतेच, पण यंदा सर्वाधिक मतांनी कोथरूडकर मला जिंकून देतील, असा विश्वास देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. एका बाजूला चंद्रकांत पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज देखील केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button