इम्तियाज जलील यांच्या विरोधात मंत्री संजय शिरसाठांनी केला अब्रूनुकसानीचा दावा, चारित्र्य हानन करुन बदनामीचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : माजी खासदार यांच्या इम्तियाज जलील यांच्या विरोधात मंत्री संजय शिरसाठ यांनी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. जलील यांनी चारित्र्य हानन करून बदनामी केली असल्याचा आरोप शिरसाट यांनी केला आहे. तसेच शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट आणि पत्नी विजया शिरसाट यांच्या व्यवहाराशी संजय शिरसाठ यांचं कोणतंही संबंध नाही. त्यामुळे जलील हे अब्रू नुकसानीच्या दाव्या प्रमाणे दोषी ठरतात असं शिरसाट यांचे वकील राजेश काळे यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट यांनी 13 जूनला इम्तियाज जलील यांच्या विरोधात मानहानी केल्याची याचिका दाखल केली आहे. 5 जूनला शिरसाट यांच्या विरोधात जलील यांनी जे वक्तव्य केले आहे, त्या विरोधात जलील यांना नोटीस पाठवली आहे. जलील यांच्या बाजूने लढवत असलेल्या सर्व प्रकरणातुन मी वकील पत्र काढून टाकले आहे. संजय शिरसाट माझे जवळचे नातेवाईक आहे. जलील यांनी 5 जूनला पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी केलेले वक्तव्य हे चारित्र्य हानन आणि बदनामी करणारे असल्याचं शिरसाट यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – अघोरी वरुन पेटलेल्या राजकारणात भरत गोगावलेंचे थेट उत्तर
संजय शिरसाट यांनी सत्तेचा गैरवापर करून दारूसाठी कंपनीसाठी midc मध्ये जागा घेतली असल्याचा आरोप जलील यांनी केला होता. शिरसाट यांच्याबद्दल लोकांच्या मनात निविटीव्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे बदनामी झाली आहे. संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गळ्यात midc ने जमीन घातली हे वक्तव्य केल्याने बदनामी झाली आहे. आरक्षण बदलून शिरसाट यांनी मुलासाठी जागा घेतली, हे बदनामी कारक आहे. शिरसाट यांचे कोणतेही सबंध या गोष्टीसोबत नाही. सिध्दांत शिरसाट आणि विजया शिरसाट यांनी midc कडे जागा मागतिली. त्यांचा अर्जाचा विचार करून त्यांना प्लॉट मिळाला. हा प्लॉट संजय शिरसाट यांनी मागीतला नाही. तसेच शिरसाट यांनी जागा मिळावी यासाठी शिफारस पत्र दिले नव्हते. शिरसाट 2023 मध्ये मंत्री नव्हते, ते फक्त एक आमदार होते. अब्रुनुकसानीचा दोन दावे आहेत, त्यातील शिक्षा व्हावी यासाठी याचिका आहे. Midc बाबत केलेल्या आरोपांबाबत फक्त ही याचिका दाखल केलेली आहे. साजापुरच्या जमिनीत देखील शिरसाट यांचा कोणताही सहभाग नाही अशी माहिती वकिलाने दिली आहे.