सावधान! देशात उन्हाचा चटका वाढणार; हवामान विभागाचा अंदाज
![Meteorological department predicts that hot summer will increase in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/Weather-Updates-780x470.jpg)
मुंबई : देशातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच येत्या काही दिवसात देशातील तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.
देशातील अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होण्याची शक्यता आहे. याशिवाय काही भागात तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
हेही वाचा – तुम्हा द्वेष पसरवा आम्ही प्रेम पसरवू..जितेंद्र आव्हाडांकडून ‘महाराष्ट्र शाहीर’चे आयोजन
महाराष्ट्रातही तापमानाचा पारा वाढणार आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत आहे. नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात ७ अंशांची वाढ होऊन पारा चाळिशी जाण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
नागपूरसह शहराच्या तापमानात देखील वाढ होत आहे. या तापमानामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संपूर्ण एप्रिल महिना आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आवकाळी पावसाने जोरदार उपस्थिती लावत उन्हाळ्यावर मात केली होती. आता मात्र खऱ्या विदर्भाच्या उन्हाळ्याला सुरूवात होणार आहे.