breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

तुम्हा द्वेष पसरवा आम्ही प्रेम पसरवू..जितेंद्र आव्हाडांकडून ‘महाराष्ट्र शाहीर’चे आयोजन

मुंबई : ‘द केरला स्टोरी’ सिनेमावरुन सध्या देशात चांगलाच वाद पेटला आहे. तरी देखील या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट मोफत दाखवण्याचे आयोजन करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. तुम्ही द्वेषाचे सिनेमे दाखवून द्वेष पसरवा; आम्ही शाहिरांचे सिनेमे दाखवून प्रेम, संस्कृती पसरवू, अशी टीका आव्हाडांनी केलेली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले आहे की, खास मराठी जनांसाठी खास मराठी चित्रपट ‘महाराष्ट्र शाहीर’चे विशेष आयोजन ठाणे प्रभात टॉकीज जिथे निळू फुले, डॉ.श्रीराम लागू यांच्यापासून थेट नाना पाटेकर यांच्यासारख्या दिग्गज मराठी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित होत त्याचं ठिकाणी शुक्रवार शनिवार रविवार संध्याकाळी ठीक ७ वाजता विनामुल्य.

हेही वाचा – मणिपूरमधील हिंसाचारावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

दरम्यान, महाराष्ट्र शाहीर सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केरला स्टोरीचे मोफत शो आयोजित केले असल्यावरून खंत व्यक्त केली होती. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र शाहीर’ प्रदर्शित झालाय. हे या नेत्यांना ठाऊक असेल का? शाहीर साबळे कोण? हे तरी माहिती असेल का? असे केदार शिंदे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button