मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन नवीन उद्योजक घडवणार!
मराठवाड्यातील नवीन उद्योजकांसाठी उद्योजक होण्यासाठी सुवर्णसंधी
पिंपरी: मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशन नवीन उद्योजक घडवण्यासाठी एमसीआय हे महाराष्ट्रभर काम करणार महाराष्ट्रातल्या तरुणांना उद्योजक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी निर्माण करण्यात आली आहे.
मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशन आयोजित उद्योजक स्नेह मेळावा व पुरस्कार वितरण सोहळा भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने केली. यावेळी दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज, पुणे चे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, कै अण्णासाहेब पाटील शैक्षणिक स्कूल, बीडचे चेअरमन रमेश पोकळे, पुण्याचे उपजिल्हाधिकारी राम चौबे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी तसेच उद्योजकांनी मार्गदर्शन केले.
जिजामाता शिक्षण संस्थेच्या शुभांगी लांडे, विद्यार्थी सहाय्यक समितीचे चंद्रकांत कुलकर्णी, प्रादेशिक परिवहनचे निरीक्षक तानाजी धुमाळ, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, सुनील गोडसे, वृक्ष मित्र पुरस्कार विजेते मराठवाडा भूषण अरुण पवार, आवटी ग्रुप ऑफ कंपनीचे सीइेओ डॉ. सुरेश साळुंखे, माऊली हायटेक नर्सरीचे चेअरमन दिलीप ठाकूर, उत्तम प्राईव्हेट लि. कंपनीचे चेअरमन उत्तम तेलगे, गोपाळ पेंट्सचे संचालक मोहनराव तिपाले, गुरूदेव पॅकेजिंग इंडस्ट्रिजचे चेअरमन दत्तात्रय गव्हाणे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन सर्व मराठवाडा कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशन व गया फाउंडेशन मधील सदस्य व वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. मुख्य आयोजक डी. एस. राठोड, शंकर तांबे, सुनील काकडे, रवी पाटील यांनी यशस्वी नियोजन केले.
मान्यवरांचा पुरस्काराने गौरव…
यावेळी ऐश्वर्या निखिल शिंदे पवार चेअरमन युवाशक्ती फाउंडेशन मराठवाडा, रंजनाताई श्रीकांत हासुरे व्याख्यात्या लेखिका, साधना रमेश बनकर, अध्यक्षा स्व. श्री. रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट, स्वातीताई विठ्ठल साठे, सरपंच माकणी ता. लोहारा यांना समाजरत्न पुरस्कार देण्यात आला. तसेच, शारदाताई तानाजी बाबर यांना आदर्श माता पुरस्कार, मीराताई काटमोरे यांना संगीतरत्न पुरस्कार, मीनाताई कर्ण पाटील यांना आदर्श माता पुरस्कार जीवन गौरव पुरस्कार, प्रकाश इंगोले, अध्यक्ष, मराठवाडा विकास प्रतिष्ठान, पुणे यांना समाज गौरव पुरस्कार, माधवराव पाटील, सरपंच उदतपूर ता. उमरगा यांना गौरवण्यात आले.
**
एमसीआयए, गया फाउंडेशनवर कौतुकाची थाप…
नवीन उद्योजक घडवण्यासाठी एम सी आय ए व गया फाउंडेशन यांनी जो उपक्रम चालू केला आहे. तो महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील उद्योजकांसाठी उद्योजक म्हणून काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे महाराष्ट्रात एकमेव फाउंडेशन उद्योजक सर्व मिळून उद्योजक घडवण्याचं काम करणार आहेत. एम सी आय ए व गया फाउंडेशन यांच्यावर महाराष्ट्रभरातून कौतुकाची थाप पडत आहे. उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या उद्योजकांचा मानसन्मान व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचेही कौतूक करण्यात आले. तसेच, ‘उद्योजक समृद्धी-2023’ अंक प्रकाशन सोहळा पार पडला.





