महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त महास्वच्छता अभियान

कुडाळ, सातारा । नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा ता.अलिबाग) यांच्या वतीने स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी, व डॉ.श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त रविवारी संपूर्ण सातारा जिल्हयातील सातारा, मेढा, औंध, वाई, चाफळ या पाच ठिकाणी २३४७ श्री सदस्य व लोकसहभागातून ३१ टन ४०० किलोग्रॅम कचरा हद्दपार करत ५९,९४४ स्कवे.मी स्वच्छता परिसर तसेच ३१.१ किलोमीटर लांबीचा दुतर्फा रस्ता परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात आले.
मोळाचा ओढा ते श्री समर्थ बैठक हॉल (नुने रोड-सातारा )येथे सोसायट्या, रस्ते; वाई येथे दुतर्फा रस्ते; औंध ता.खटाव येथे श्री यमाई देवी मंदीर परिसर, यात्रा स्थळ, मुख्य रस्ते व लगतची शासकीय कार्यालये; मेढा ता.जावळी येथील मुख्य रस्ते व बाजारपेठ तसेच चाफळ ता.पाटण येथील श्रीराम मंदीर परिसर, मुख्य रस्ता आदी ठिकाणी महास्वच्छता अभियानप्रसंगी विविध मान्यवर,स्थानिक नागरिक,तरूण मंडळे,विविध सामाजिक संघटनेचे शेकडोजण उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. स्वच्छता जनजागृतीबाबत विविध घोषवाक्य वापरण्यात आले होते.
जनमानसात स्वच्छतेविषयी,पर्यावरण संवर्धनाविषयी जागृती, प्रत्येक परिसर स्वच्छ राहण्यासाठी प्रशासकीय कार्यालये, वाहतुक मार्ग स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड, स्वच्छता अभियान असे अनेकविध उपक्रम डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येतात. गेल्या अनेक वर्षापासुन अविरतपणे सुरू असलेल्या ह्या कार्याची जगभरात ख्याती असुन स्वयंप्रेरणा आणि सेवाभाव या हेतूने अभियान यशस्वी करण्यात आले.





