खुशी कपूरचा स्टायलिश ‘व्हिंटेज’ फोटोशूट व्हायरल

Khushi Kapoor | खुशी कपूर हिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोशूटमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गुलाबी रंगाच्या ‘व्हिंटेज’ स्टाइलमधील तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
खुशी कपूरने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये गुलाबी रंगाचा कॉर्सेट टॉप परिधान केला आहे. या टॉपवर फ्लोरल प्रिंट असून काळ्या जाळीदार पट्ट्यांमुळे हा लूक ‘कोक्वेट’ फॅशनचा उत्तम नमुना दिसत आहे. त्यासोबत तिने मॅचिंग फ्लोरल प्रिंटचे शॉर्ट्स परिधान केले असून संपूर्ण आऊटफिट अतिशय स्टायलिश दिसत आहे.
हेही वाचा : श्रीक्षेत्र आळंदी यात्रेकरिता अनुदान वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना ‘‘साकडे’’!
या फोटोशूटची बॅकग्राउंडही लक्षवेधी ठरली आहे. गुलाबी रंगाची भिंत आणि मागील बाजूस असलेले कुत्र्याचे पेंटिंग यामुळे फोटोला एक वेगळा आणि क्लासी फील मिळाला आहे. त्यामुळे खुशीचा हा ‘व्हिंटेज’ लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, खुशी कपूर ही निर्माते बोनी कपूर यांची धाकटी मुलगी असून अभिनेत्री जान्हवी कपूर हिची बहीण आहे. ‘The Archies’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तसेच काही दिवसांपूर्वी खुशी आणि अभिनेता वेदांग रैना यांच्या रिलेशनशिपबाबतही चर्चा सुरू होती. मात्र अलीकडेच दोघांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्यांमुळे चाहत्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.





