TOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोयत्याने वार करत एकाचा खून

पिंपरी l  प्रतिनिधी

गाडी बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चार जणांनी मिळून एकावर कोयत्याने वार करत त्यांचा खून केला. ही घटना बुधवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमासार चाकण मधील कान्हेवाडी गावात घडली.

दिनेश मच्छिंद्र बहीरट (वय 36, रा. कान्हेवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, मयूर दगडू येवले (वय 28, रा. कान्हेवाडी) यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राजेश येवले, ओंकार ढोरे, प्रसाद येवले (सर्व रा. कान्हेवाडी) आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दिनेश बहिरट हे फिर्यादी येवले यांच्या घरासमोरून गाडी बाजूला घेत होते. त्या वेळी आरोपी राजेश येवले यांच्याशी त्यांचे भांडण झाले. त्या दरम्यान, आरोपी ढोरे आणि प्रकाश येवले हे हातात कोयते घेऊन आले. ढोरे याने फिर्यादी येवले यांच्यावर पहिला वार केला. मात्र, त्यांनी तो हुकविला. या वेळी कोयत्याचे टोक त्यांच्या जर्किनमध्ये अडकून त्यांचे जर्किन फाटले. त्यानंतर आरोपी राजेश येवले आणि अनोळखी आरोपीने फिर्यादी यांना मागून पकडले. तसेच आरोपी ढोरे आणि प्रसाद येवले यांनी मयत दिनेश यांच्या डोक्यात कोयत्याने वार करत त्यांना जीवे मारले. चाकण पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button