Breaking-newsपिंपरी / चिंचवडपुणे

#waragainstcorona: पुणे विभागातील 1 हजार 886 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोना बाधित 4 हजार 20 रुग्ण

पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी

पुणे विभागातील  1 हजार 886 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार 20   झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण  1 हजार 924 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 210  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 145 रुग्ण  गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

          यापैकी पुणे जिल्हयातील 3 हजार 490   बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 1 हजार 702  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  1 हजार  603 आहे. कोरोनाबाधित एकूण 185  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच    133 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 

          सातारा जिल्हयातील 125  कोरोना बाधीत रुग्ण असून 35 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 88  आहे. कोरोनाबाधित एकूण 2   रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

          सोलापूर जिल्हयातील  336  कोरोना बाधीत रुग्ण असून 110  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 205 आहे. कोरोना बाधित एकूण  21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयातील 43  कोरोना बाधीत रुग्ण असून  29  बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  13  आहे. कोरोना बाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

          कोल्हापूर जिल्हयातील 26  कोरोना बाधीत रुग्ण असून 10 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  15 आहे. कोरोना बाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यत विभागामध्ये एकुण 43  हजार 23  नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 39  हजार  16 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4  हजार 7  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी          35   हजार  1  नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 4   हजार 20  चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागामधील 5  लाख 48  हजार 588  घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत    18  लाख 86 हजार 844  व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी  2 हजार 886  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button