मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित? आज मुंबईत बैठका, राजकीय घडामोडींना वेग
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिल्लीत अमित शाह यांच्यासह महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतं आहे. मात्र अद्याप याबाबत कुणीही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं. मुंबईत भाजपाची बैठक होईल या बैठकीनंतर इतर चर्चा होऊन निर्णय होईल असं सांगितलं. दुसरीकडे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. जे मिळेल ते त्यांना पदरात पाडून घ्यावं लागणार आहे असा टोला संजय राऊत यांनी लगावला. यासह सगळ्या राजकीय घडामोडींवर आपली नजर आजच्या ब्लॉगमधून असणार आहे.
हेही वाचा – महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर; कोण होणार मंत्री?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दिल्लीत अमित शाह यांच्यासह महायुतीचे नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची चर्चा झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाला पसंती असल्याचं समजतं आहे.