Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘माझा एकच गुन्हा आहे की मी खरं बोलतो’; इंदुरीकर महाराजांचं विधान चर्चेत

Indurikar Maharaj : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. असा माणूस राहिला नाही की त्याने मला शिव्या दिल्या नाहीत. माझा एकच गुन्हा आहे की मी फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं भोगतो, असं ते म्हणाले. त्यांचं हे विधान सध्या चांगलच चर्चेत आहे.

इंदुरीकर महाराज म्हणाले, असा माणूस राहिला नाही की त्याने मला शिव्या दिल्या नाहीत. माझा एकच गुन्हा आहे की मी फक्त खरं बोलतो आणि त्याची फळं भोगतो. थोडं वेगळं किर्तन आहे, पण काळाची गरज आहे. थोडं वाईट वाटतं लोकांना मी थेट बोलतो म्हणून. पण हाच पर्याय आहे.

हेही वाचा  –  ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल बसचा मोठा अपघात, २ महिला ठार तर ५५ जखमी 

संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ज्याला देव व्हायचं आहे त्याने संपत्ती आणि दया एकत्र केली पाहिजे. दान करायला शिका. पण ज्याला गरज आहे त्यालाच दान करा. सत्कार करा, पण गरिबाचाच करा. श्रीमंताचा सत्कार करून बरगड्या मोडू नये. खाऊन माजलेत त्याला अन्नाची गरज नाही. पण ज्याला गरज आहे त्याला द्या. गायीची केलेली सेवा, तुळशीला घातलेलं पाणी, किर्तनकाराचं घेतलेलं दर्शन, वारकऱ्याला पाजलेला चहा, काळ्या आईची सेवा, सप्ताहाला दिलेला रुपया कधी फेल जात नाही, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button