ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’

५०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग: मोशी येथे १५ डिसेंबरपर्यंत आयोजन

पिंपरी-चिंचवड: ‘किसान’ या भारतातील सर्वात मोठ्या कृषि प्रदर्शनाचे उदघाटन प्रदर्शनाला येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात आले. दिनांक ११ ते १५ डिसेंबर २०२४ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, पुणे येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

१५ एकर पसरलेल्या प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या ५ दिवसांमध्ये देशभरातून एक लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
किसान प्रदर्शनाला शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ उद्योगातील कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आयोजित केले आहे.

पूर्वनोंदणी : प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. ३०,००० हुन अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.

किसान आता मोबाईलवरसुद्धा…
प्रत्यक्ष प्रदर्शनातील सहभागासोबतच प्रदर्शक कंपन्या किसान ॲपवर त्यांच्या उत्पादनांची डिजिटल यादी देखील प्रसिद्ध करू शकतात. शेतकरी घरबसल्या विविध उत्पादनांविषयी माहिती मिळवू शकतात आणि त्यांच्या मोबाईलवर संबंधित व्हिडिओ पाहू शकतात. प्रदर्शक आणि अभ्यागत प्रत्यक्ष प्रदर्शनात भेटण्यापूर्वीच किसान ॲपच्या माध्यमातून परस्परांशी संवाद सुरू करू शकतात.

मातीमोल…
या वर्षी किसानमध्ये मातीमोल हा मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम साजरा केला जात आहे. आपली माती जिवंत आहे की नाही? यावर चर्चा सुरू करणे, मातीच्या आरोग्याविषयी शेतकरी समुदायामध्ये जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. चला आपल्या मातीची स्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया, अर्थात मातीमोल जाणूया. हा उपक्रम जैवतंत्रज्ञान विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरेखित विभागांसोबत संयुक्तपणे आयोजित करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button