Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

वाढत्या पर्यटनाचा नागरी सुविधांवर ताण, रायगड जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था कोलमडली

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील वाढत्या पर्यटनाचा नागरी सुविधांवर ताण पडण्यास सुरवात झाली आहे. पायाभुत सुविधांचा आभाव आणि क्षमतेपेक्षा जास्त येणारे पर्यटक यामुळे पर्यटनस्थळांचा कोंडमारा होत असल्याचे दिसून येत आहे.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, काशिद, नागाव, मांडवा, किहीम, आवास, आक्षी, रेवदंडा हि ठिकाणे गेल्या काही वर्षात न्यू इअर डेस्टीनेशन म्हणून नावारुपास आली आहेत. मुंबईपासून जवळ असल्याने, राहण्याची आणि जेवणाची मुबलक सोय असल्याने दरवर्षी मुंबईतील लाखो पर्यटक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या परीसरात येऊ लागली आहे. यामुळे स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. पण दुसऱ्या बाजूला स्थानिक नागरी सुविधांवर याचा प्रचंड ताण निर्माण पडत आहे. त्यामुळे पर्यटनाच्या अनुषंगाने येथील पायाभुत सुविधांचा विकास होण गरजेच आहे.

अलिबाग आणि मुरुड या तालुक्यात गेल्या चार दिवसात साधारणपणे दिड ते दोन लाख पर्यटकांनी हजेरी लावली, माथेरान, दिवेआगर, हरिहरेश्वर, श्रीवर्धन हि ठिकाणही पर्यटकांनी गजबजून गेले होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी पर्यटक दाखल झाल्याने, वाहतूक समस्यातर उद्भवलीच, पण स्थानिक प्रशासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या सुविधांवर त्याचा ताण पडला.

अलिबाग शहरा पुरता विचार करायचा झाला, हॉटेल व्यवस्था, वाहतुक व्यवस्था, पोलीस यंत्रणेवरही अतिरीक्त ताण आला. यामुळे ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिध्द असलेले अलिबाग मुंबईतील गर्दीप्रमाणे कोंडलेले पहायला मिळाले. हॉटेल्स आणि लॉजेसच्या शोधात पर्यटक रात्रभर फिरत होते. अरुंद रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली होती. पार्कींगच्या सुविधा कमी पडत होत्या. अलिबाग हे केवळ एक उदाहरण आहे. जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन थोडीफार अशीच परिस्थिती होती.

हेही वाचा –  राज्यात थंडीचा कडाका; विदर्भ-उत्तर महाराष्ट्रात तापमान आणखी घसरणार

ही बाब लक्षात घेऊन या पर्यटन केंद्रांच्या पायाभुत विकासाला चालना देणे गरजेचे आहे. राज्यातील इतर भागांच्या तुलनेत दरवर्षी अलिबाग मुरुड परीसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेतली तर ती कितीतरी अधिक आहे. त्यामुळे मागील काही वर्षात इथे २ हजारहून अधिक हॉटेल्स, लॉजेस आणि निवास न्याहरी केंद्र उभी राहिली आहेत. पण ज्या प्रमाणात पर्यटकांची आणि हॉटेल्सची संख्या वाढते आहे. त्या प्रमाणात रस्ते, वीज, पाणी, पार्कीग, सार्वजनिक स्वच्छतागृह या सुविधा विकसीत झालेल्या नाहीत. स्थानिक ग्रामपंचायती आणि नगरपालिकांचे उत्पन्न मर्यादीत असल्याने, या सुविधा विकासित करणे त्यांना शक्यही होत नाही. त्यामुळे राज्यसरकारने या ठिकाणांचा पर्यटन पूरक विकास करणे गरजेच आहे. त्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून निधी उपलब्ध करून देण गरजेच आहे.

रायगड जिल्ह्यातील ५९ गावांच्या पर्यटन विकासासाठी २४३ कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र दोन वर्ष उलटली तरी राज्य सरकारकडून आराखड्याला मंजुरी मिळालेली नाही. एकीकडे रायगड किल्ल्याच्या विकासाठी ६०० कोटी आराखडा मंजुर झाला आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांना निधीची वानवा आहे असे विरोधाभासी चित्र सध्या पहायला मिळत आहे.

अलिबाग हे मुंबईशी जलवाहतुकीचे जोडले आहे. दररोज साधारणपणे तीन ते साडे तीन हजार लोक जलमार्गाने प्रवास करतात. आठवड्याच्या शेवटी हि संख्या दहा ते बारा हजारांच्या घरात झाते. मात्र २४ डिसेंबर ते २८ डिसेंबर या चार दिवसा ६० ते ७० हजार पर्यटकांांनी या जलवाहतुकीचा वापर केला पर्यटकांांची संख्या लक्षात घेऊन जादा प्रवासी बोटी सोडण्यात आल्या होत्या मात्र तरीही देखील ही व्यवस्था अपुरी पडत होती.

नाताळाची सुट्टी साजरी करून रविवारी अलिबागमध्ये आलेले पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाले. त्यामुळे सकाळपासूनच अलिबाग एसटी बसस्थानकात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र अलिबाग आगारातून सुटणाऱ्या बहुतांश गाड्या आधीच आरक्षित झाल्याने प्रवाशी मोठ्या प्रमाणात अडकून पडले. ही बाब लक्षात घेऊन आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या. मात्र प्रवाश्यांची संख्या जास्त असल्याने एसटीची सेवा अपुरी पडत असल्याचे या निमित्याने दिसून आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button