पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
Pune Helicopter Collapsed | पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
हेही वाचा – गंगोत्री पार्क- दिघी रोडच्या मुद्यावर अजित गव्हाणे यांचा ‘सेल्फ गोल’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन मध्ये पावणे सातच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. धुकं असल्याने बराच वेळ हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घेत होत. अखेर ते क्रॅश झालं आणि जमिनीवर कोळलं. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस पोहचले आहेत. याआधी देखील मुळशी मध्ये खासगी हेलिकॉप्टर कोसळलं होतं सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नव्हती. परंतु, त्या अपघातात काहीजण गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडलेली आहे.