वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर सरकारची करडी नजर; फोटो नव्हे, आता व्हिडिओद्वारे होणार कारवाई

नवी दिल्ली : आता वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास, केवळ फोटोच्या आधारे नव्हे तर व्हिडिओ पुराव्याच्या आधारे चलन केले जाईल. केंद्र सरकारने एक नवीन मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली आहे, ज्या अंतर्गत स्वयंचलित कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचे निरीक्षण केले जाईल.
रिपोर्ट्सनुसार, रस्ते अपघात कमी करणे आणि वाहतूक व्यवस्था अधिक कडक आणि पारदर्शक बनवण्याच्या उद्देशाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात ही एसओपी सादर केली आहे.
हेही वाचा – आता एसटीमध्येही ‘पॅनिक बटण’; महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महामंडळाचा मोठा निर्णय
एसओपीमध्ये २०० किमी प्रतितास वेगानेही व्हिडिओ पुरावे रेकॉर्ड करण्यावर भर दिला जातो. जेणेकरून लक्ष विचलित होऊन आणि चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळे होणारे रस्ते अपघात आणि मृत्यू कमी करता येतील. मोटार वाहन कायद्यानुसार इलेक्ट्रॉनिक देखरेखीच्या अंमलबजावणीचा अहवाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने २३ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांना (UTs) दिले होते, त्यानंतर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.