लाडक्या बहिणींना सरकारचं बिग सरप्राईज, योजनेबाबत मोठी अपडेट

Ladki Bahin Yojana : ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे आडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. जुलै 2024 पासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये एकूण सात हाप्ते जमा करण्यात आले आहेत. मात्र आता फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी देखील आठवा हाप्ता खात्यात जमा न झाल्यानं लाभार्थी महिलांचं लक्ष फेब्रुवारीच्या हाप्त्याकडे लागले आहे. फेब्रुवारीचा हाप्ता कधी जमा होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
फेब्रुवारीचा हाप्ता वेळेत जमा होणार होता, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हाप्ता मिळण्यास विलंब झाला आहे. राज्याच्या वित्त विभागाकडून आठव्या हाप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला 3490 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा हाप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सोमवारपासून म्हणजे तीन मार्चपासून फेब्रुवारीचा हाप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे दीड हजार आणि चालू महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय !
दरम्यान आमचं सरकार जर पुन्हा सत्तेत आलं तर आम्ही लाभार्थी महिलांना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे, त्यामुळे आता 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढीव हाप्ता लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यात आहे. दुसरीकडे ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांना या योजनेतून वगळ्यात देखील आलं आहे. मात्र ज्या महिला निकषात बसतात त्यांना पैसे मिळत राहातील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.