Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

निवडणुकीनंतरच लाडक्या बहिणींना 3000 द्या, थेट निवडणूक आयोगालाच पत्र

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दिले जाणारे ३ हजार रुपये निवडणुकीनंतरच वितरित करावेत, अशी मागणी काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. या मागणीवरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली असून, “लाडक्या बहिणींविरोधातील काँग्रेसचा द्वेषाचा चेहरा उघड झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला आहे.

बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला पाहवत नाही. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर सुरुवातीपासूनच काँग्रेसकडून या योजनेला विरोध करण्यात येत आहे. याआधी काँग्रेस समर्थक कार्यकर्त्याने ही योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती, असे त्यांनी नमूद केले.

“बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, त्यांच्या संसाराला आधार मिळतो आहे. हे पाहून काँग्रेसचा द्वेष, मत्सर आणि आकस पुन्हा उफाळून आला आहे,” असा आरोप बावनकुळे यांनी केला. संक्रांतीच्या पर्वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ या दोन महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करणार आहे. मात्र, हे पैसे देऊ नयेत म्हणून काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र दिले, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि राज्यातील माता-भगिनी काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा –  ‘णमोकार तीर्थ महोत्सवासाठी प्रस्तावित कामे विहित मुदतीत पूर्ण करा’; विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

दरम्यान, काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या अगोदर दोन महिन्यांचे ३ हजार रुपये एकत्रित देणे ही बाब १ कोटीहून अधिक महिला मतदारांवर प्रभाव टाकणारी असून, सत्ताधारी पक्षाच्या बाजूने मतदान करण्यास प्रवृत्त करणारी आहे. हा प्रकार सामूहिक सरकारी ‘लाच’ ठरतो आणि यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसने स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, मात्र डिसेंबर २०२५ आणि जानेवारी २०२६ चे पैसे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वितरित करावेत, असे निर्देश आयोगाने सरकारला द्यावेत, अशी आमची मागणी आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button