Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

IPL 2026 : प्लेऑफचे ‘टॉप ४’ संघ ठरले! राजस्थान रॉयल्सची शेवटच्या क्षणी धडक; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IPL 2026 Playoffs | आयपीएल २०२६ स्पर्धा आता आपल्या अंतिम आणि सर्वात रोमांचक टप्प्यात पोहोचली आहे. स्पर्धेतील साखळी फेरीचे सर्व सामने पूर्ण झाले असून प्लेऑफमध्ये पोहोचणारे चारही संघ अखेर निश्चित झाले आहेत. प्लेऑफचे ३ संघ आधीच ठरले होते, मात्र चौथ्या जागेसाठी कमालीची चुरस निर्माण झाली होती. अखेर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर मात करत प्लेऑफचे चौथे तिकीट खिशात घातले आहे.

या शेवटच्या स्थानाचा फैसला मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यावर अवलंबून होता. मुंबईने हा सामना जिंकला असता तर पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मार्ग मोकळा झाला असता. मात्र, राजस्थानने मोक्याच्या क्षणी बाजी मारत १६ गुणांसह गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले.

अशी आहे गुणतालिका

साखळी फेरीअखेर नेट रनरेटच्या फरकामुळे गुणतालिकेत कमालीची स्पर्धा पाहायला मिळाली:

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ १८ गुणांसह गुणतालिकेत अव्वल म्हणजेच पहिल्या स्थानी आहे.
  • गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.
  • सनरायझर्स हैदराबादचा संघ १८ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.
  • राजस्थान रॉयल्सचा संघ १६ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

हेही वाचा

सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका! १० दिवसात चौथ्यांदा दरवाढ, पेट्रोल २.७२ रु. डिझेल २.१८ रु. महागलं

प्लेऑफ सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

१. क्वालिफायर १

गुणतालिकेत पहिल्या स्थानी असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दुसऱ्या स्थानावरील गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये क्वालिफायर १ चा सामना होणार आहे. हा सामना मंगळवारी २६ मे रोजी संध्याकाळी ७:३० वाजता धरमशालेच्या मैदानावर खेळवला जाईल.

२. एलिमिनेटर

एलिमिनेटरचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना बुधवार २७ मे रोजी संध्याकाळी ७:३० वाजता न्यू चंडीगडमध्ये खेळवला जाणार आहे.

३. क्वालिफायर २

क्वालिफायर १ मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटरच्या विजेत्या संघात क्वालिफायर २ चा सामना होणार आहे. हा सामना शुक्रवारी २९ मे रोजी संध्याकाळी ७:३० वाजता न्यू चंडीगडमध्ये खेळवला जाणार आहे.

४. अंतिम सामना

स्पर्धेतील महाअंतिम सामना रविवार, ३१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

‘क्वालिफायर १’ चा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत होणाऱ्या संघाला ‘क्वालिफायर २’ च्या माध्यमातून अंतिम फेरीत पोहोचण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button